बुधवार, २८ डिसेंबर, २०२२

वडील होण्यासाठी पुरुषांचं योग्य वय कोणतं ? या वयानंतर थांबते स्पर्मची निर्मिती

मुलं होण्याच्या बाबतीत पुरुषांच्या वयाइतकंच स्त्रियांचं वय महत्त्वाचं असतं. याचं कारण म्हणजे वाढत्या वयाबरोबर पुरुषांमध्ये स्पर्मची संख्या आणि त्याची गुणवत्ता कमी होऊ लागते.

स्त्रियांना मुलं होण्यासाठी योग्य वय असतं, असं अनेकदा म्हटलं जातं. तुम्हीही याबाबत काहीवेळ ऐकलं असेल. मग पुरुषांच्या बाबतीत ही गोष्ट वेगळी असते का? पुरुष कोणत्याही वयात वडील होऊ शकतात का? असाही प्रश्न समोर येतो. मुलं होण्याच्या बाबतीत पुरुषांच्या वयाइतकच स्त्रियांचं वय महत्त्वाचं असतं. याचं कारण म्हणजे वाढत्या वयाबरोबर पुरुषांमध्ये स्पर्मची संख्या आणि त्याची गुणवत्ता कमी होऊ लागते.

वडील होण्यासाठी योग्य वय कोणतं?

तज्ज्ञांच्या मतानुसार, पुरुषांसाठी वडील होण्यासाठी 20 ते 30 वर्षे वय योग्य आहे. पुरुष 50 किंवा त्याहून अधिक वयाचे असले तरीही मुलं होऊ शकतात. 

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनुसार, एका व्यक्तीने वयाच्या 92 व्या वर्षी मुलाला जन्म दिला. संशोधकांच्या म्हणण्याप्रमाणे, मुलाला जन्म देण्यासाठी पुरुषांचं वय खूप महत्वाचं आहे. वयाच्या 40 वर्षांनंतर पुरुषांमध्ये बाप होण्याची शक्यता कमी होऊ लागते.

बायोलॉजिकल क्लॉक:


तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, पुरुषांमधील स्पर्मचं उत्पादन कधीच थांबत नाही. मात्र परंतु वयानुसार, स्पर्मचं डीएनए नुकसान होण्याची शक्यता लक्षणीय वाढते, ज्यामुळे प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो. न जन्मलेल्या बाळाच्या आरोग्यावरही त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो.

अनेक अभ्यासांमधून हे समोर आलंय की, जेव्हा पुरुष मोठ्या वयात पिता होतात तेव्हा मुलांमध्ये न्यूरोडेव्हलपमेंटल विकार होऊ शकतात. 2010 च्या एका अभ्यासात असं आढळून आलंय की, 40 वर्षांनंतर वडील बनलेल्या पुरुषांना त्यांच्या मुलांमध्ये ऑटिझम स्पेक्ट्रम विकसित होण्याचा धोका पाचपट आहे.

कोणत्या वयानंतर स्पर्मची निर्मिती थांबते ?

जागतिक आरोग्य संघटनेने स्पर्मचे काही निकष ठेवले आहेत. ज्यावरून निरोगी स्पर्म ठरवले जातात. यामध्ये स्पर्मची संख्या, आकार आणि हालचाल समाविष्ट आहे. त्यानुसार, वयाच्या 35 व्या वर्षी पोहोचताच पुरुषांमध्ये हे स्पर्म पॅरामीटर खराब होऊ लागतं.

या वयात पुरुष असतो सर्वात फर्टाइल

22 ते 25 वर्षांच्या दरम्यान, पुरुष सर्वात फर्टाइल असतात. अशा परिस्थितीत, त्यांना 35 व्या वर्षात मुलं जन्माला घालण्याचा सल्ला दिला जातो. कारण या वयानंतर प्रजनन क्षमता बिघडू लागते. जर तुम्ही वयाच्या 45 वर्षांनंतर मूल होण्याचा विचार करत असाल तर सर्वप्रथम डॉक्टरांशी संपर्क साधा.


संकलन : सुशिल म. कुवर

फोटो : प्रतिकारात्मक आहे आवर्जून शेअर करू शकता.


बुधवार, २८ सप्टेंबर, २०२२

मुलांनो, लग्नापूर्वी शरीर संबंध ठेवताय ? तर 'या' गोष्टी लक्षात ठेवा

एकदा का प्रेम जडले की, त्याबद्दल घडणारी कुठलीही गोष्ट कुतुहल वाटते. या वयात प्रेम असते की, आकर्षण हे आपल्याला कळत नाही. न कळत जडलेल्या या प्रेमात आपण अधिक वाहवत जातो.

पहिल्यांदा शरीर संबंध ठेवण्यात जितकी जास्त उत्सुकता वाटते तितकीच चिंता देखील. केवळ मुलीच नाही तर मुले देखील शरीर संबंध ठेवताना अधिक वेळा घाबरतात. शरीर संबंध ठेवताना नेमके त्यावेळी शरीराची काळजी कशी घ्यावी हे देखील त्यांना कळत नाही. योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे त्यांच्याकडून अनेक चुका देखील होतात.

भारतासारख्या देशात शरीर संबंधाविषयी उघडपणे बोलण्यासाठी अनेकांना संकोच वाटतो. इतर अनेक सोशल साइट्सला याविषयी अनेकदा सर्च केले जाते परंतु, याविषयी तरुण वयातील मुलांना काही कळण्याचा मार्ग नसतो. त्यासाठी शरीर संबंध पहिल्यांदा ठेवल्यानंतर काय काळजी घ्याल हे जाणून घेऊया.

१. शरीर संबंध ठेवताना योग्य वेळ पहा. हे करण्यासाठी दोघांकडे ही पुरेसा वेळ असणे गरजेचे आहे. घाईघाईने शरीर संबंध ठेवल्यास नात्यात पुढे जाऊन अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. तसेच योग्य जागा देखील निवडायला हवी.

२. पहिल्यांदा शरीर संबंध ठेवताना बरेच जोडीदार कंडोमचा वापर करत नाही. अशावेळी आपल्याला शरीराची स्वच्छता देखील राखणे गरजेचे आहे. चांगल्या शरीर संबंधाचा आनंद घ्यायचा असेल तर पूर्वनियोजन करणे अधिक गरजेचे आहे. त्यासाठी कोणत्याही प्रकारची लिंग वर्धक औषधे घेण्यास विसरू नका. याशिवाय कपड्यांबाबत कोणतीही चूक करू नका.

३. पहिल्यांदा शरीर संबंध ठेवताना अनेकदा जोडीदाराला संकोच वाटतो. त्यासाठी बळजबरी करु नका. त्यासाठी जोडीदाराशी प्रेमाने व समजेल अशा भाषेत संवाद साधा. अशावेळी गर्दी देखील टाळा, स्वत:वर नियंत्रण ठेवा.


संकलन : सुशिल म. कुवर

फोटो : प्रतिकात्मक आहे आवर्जून शेअर करू शकता.


मंगळवार, ७ जून, २०२२

चला जाणून घ्या ! रोज सेक्स करण्याचे हे आहेत 9 फायदे

जर तुम्ही सेक्सलाच तुम्हाला आनंद देणारी कृती मानत असाल तर तुम्ही थोडे चुकीचे आहात. सेक्सचेही अनेक फायदे आहेत. एवढेच नाही तर नियमित सेक्स केल्यास त्याचे फायदेही होतात. चला जाणून घेऊया रोज सेक्स केल्याने कोणते फायदे होतात.


1. हृदयविकाराचा धोका कमी होतो

नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात असे समोर आले आहे की, सेक्सच्या बाबतीत सक्रिय पुरुषांना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका कमी असतो. जे लोक आठवड्यातून किमान दोनदा सेक्स करतात त्यांना महिन्यातून एकदा सेक्स करणाऱ्यांपेक्षा कमी धोका असल्याचे दिसून आले.
2. प्रतिकारशक्ती वाढवणे

नियमित सेक्स केल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. हे आपले शरीर सामान्य आजारांना सामोरे जाण्यास अधिक सक्षम बनवते. जसे की सामान्य सर्दी आणि ताप.

3. तणावाचा सामना करण्यास मदत 

काम आणि कौटुंबिक समस्यांमुळे तुम्ही तणावात आहात का? तसे असल्यास, त्यावर मात करण्यासाठी सेक्स हा देखील एक चांगला मार्ग असू शकतो. अभ्यासानुसार, जे लोक बेडरूममध्ये सक्रिय असतात ते कोणत्याही दबावाला चांगल्या प्रकारे सामोरे जाण्यास सक्षम असतात.

4. डोकेदुखी कमी होते

जर तुम्ही डोकेदुखीचा हवाला देऊन प्रेम टाळत असाल तर तसे करणे थांबवा. याचे कारण असे की जेव्हा कामोत्तेजनापर्यंत पोहोचते तेव्हा शरीरातील ऑक्सिटोसिनची पातळी 5 पटीने वाढते. यामुळे शरीरातील अनेक प्रकारच्या वेदना दूर होतात.
5. आयुष्य वाढते 

नियमित सेक्स करणाऱ्या लोकांचे वयही वाढते. कारण डिहायड्रोएपियान्ड्रोस्टेरॉन हा संप्रेरक संभोग झाल्यावर बाहेर पडतो. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि ऊतींची दुरुस्ती होते.

6. रक्ताभिसरण वाढवते

सेक्स करताना हृदयाची गती वाढते आणि त्यामुळे शरीराच्या सर्व भागांमध्ये रक्ताभिसरण वाढते.

7. चांगली झोप

सेक्स नंतर चांगली झोप लागते. यासह, दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही आरामशीर जागे व्हाल आणि तुमचे काम अधिक चांगले करा. याशिवाय तुम्हाला सकारात्मक वाटते.
8. फिटनेस सुधारणे

जर तुम्हाला तुमचा फिटनेस सुधारण्यासाठी जिममध्ये जायचे असेल किंवा अधिक मेहनत करायची असेल, तर हा देखील एक मार्ग आहे. सेक्स केल्याने शरीर सुदृढ राहण्यास मदत होते. नियमित सेक्स केल्याने कंबरेची चरबी कमी होते. सुमारे अर्धा तास प्रेम करून 80 पेक्षा जास्त कॅलरीज बर्न होतात.

9. स्नायू मजबूत होतात

सेक्स दरम्यान पुरुषांच्या शरीरातून टेस्टोस्टेरॉन हा हार्मोन बाहेर पडतो. यामुळे स्नायू आणि हाडे देखील मजबूत दिसतात.

संकलन : सुशिल म. कुवर
फोटो : प्रतिकात्मक आहे आवर्जून शेअर करू शकता.

चुंबनाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या एका क्लिकवर


चुंबनाचे फायदे : प्रेमामुळे चेहऱ्यावर एक मोठं हसू येतं, पण हे प्रेम चुंबनाशिवाय अपूर्ण असतं. तुमच्या नात्यात प्रेम असेल तर काहीही होईल. जगभरात प्रेम व्यक्त करण्यासाठी चुंबन केले जाते. चुंबन केवळ भागीदारांमध्येच नाही, तर आईला माहित नसते की ती आपल्या मुलाला किती वेळा चुंबन देते. घरातील वडीलधारी मंडळीही गालाचे चुंबन करतात. परंतु अलीकडे त्याला एक वेगळ्या नजरेने पाहिले जात असले, तरी चुंबन करण्याची परंपरा अगदी पुर्वीपासून आहे. अगदी प्रेम व्यक्त करण्यासाठी चुंबन घेतले जाते.

प्रेम व्यक्त करण्याचा यापेक्षा चांगला मार्ग क्वचितच असू शकतो. जेव्हा जोडपे एकमेकांना चुंबन घेतात तेव्हा प्रेमासोबत अनेक शारीरिक फायदेही होतात. चुंबनात आनंदी हार्मोन्स बाहेर पडतात. जे तणाव आणि चिंता दूर करते. किस केल्याने चेहऱ्याचे स्नायू मजबूत होतात. किस केल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्याची समस्याही कमी होते. चला जाणून घेऊया किस केल्याने कोणते फायदे होतात.

• चुंबन घेण्याचे फायदे : 

1. प्रतिकारशक्ती वाढवा : तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की किस केल्याने प्रतिकारशक्ती वाढते. यामुळे अतिसंवेदनशीलता कमी होते. एका अभ्यासानुसार, किस केल्याने पार्टनरचा स्रव एकमेकांच्या तोंडात जातो, ज्यामुळे काही नवीन जंतू तुमच्या तोंडात जातात. यामुळे शरीरात त्या जंतूंविरुद्ध अँटीबॉडीज तयार होतात आणि भविष्यात तुम्ही त्यांच्यापासून आजारी पडत नाही.

2. हॅपी हार्मोन्स रिलीझ : किस केल्याने शरीरात आनंदाची भावना येते. चुंबन केल्याने ऑक्सिटोसिन, डोपामाइन आणि सेरोटोनिन सारखी रसायने बाहेर पडतात, जे तुमच्या भावना आणि बंध मजबूत करतात.

3. तणाव दूर करा : चुंबन केल्याने कोर्टिसोलची पातळी कमी होते, त्यानंतर तुम्ही तणावमुक्त बनता. किस केल्याने चेहऱ्यावर हसू येते. अशा स्थितीत तुम्ही तणाव, थकवा आणि इतर समस्यांपासून दूर राहता.

4. चुंबनाचे इतर फायदे : चुंबन केल्याने तुम्ही दीर्घकाळ तरूण राहता. यामुळे तुमचे ओठ, गाल, चेहरा, जीभ, जबडा आणि मानेच्या स्नायूंचा व्यायाम होतो. किस केल्याने रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि वृद्धत्व कमी होते. चुंबन तुम्हाला निरोगी, सुंदर आणि मजबूत बनवते.

5. चेहऱ्याचे स्नायू मजबूत करा : किस केल्याने चेहऱ्याचे स्नायू मजबूत होतात. 34 चेहऱ्याचे स्नायू आणि 112 पोस्टुरल स्नायू सतत किस करण्यात गुंतलेले असतात, ज्यामुळे सुरकुत्या पडण्याची समस्या होत नाही आणि चेहरा दीर्घकाळ तरूण राहतो.

संकलन : सुशिल म. कुवर

फोटो : प्रतिकात्मक आहे आवर्जून शेअर करू शकता.


मंगळवार, ३१ मे, २०२२

पहिल्यांदा सेक्स करताना या 8 गोष्टी ठरतील लाभदायक !

पहिल्या सेक्स अनुभवाबद्दल प्रत्येकाच्याच काही कल्पना, आशा आणि अपेक्षा असतात. मात्र वास्तव अनेकदा वेगळं असतं. जोडप्यांमधला बुजरेपणा, भीती किंवा अवघडलेपण यामुळे परिस्थिती बिघडू शकते. म्हणूनच पहिल्यांदा सेक्स करताना पुरूषांनी या काही गोष्टींचे जरूर भान ठेवायलाच हवे.

१ ) कंडोम विसरू नका

पहिल्यांदा सेक्स करताना सर्वात आधी येते ती सुरक्षितता. ही बाबदेखील महत्त्वाची आहे. बरेचदा पुरुष उत्साहाच्या भरात सुरक्षेचा विचार करतच नाहीत, परिणामी लैंगिक आजार किंवा अनावश्यक गर्भधारणा होण्याची शक्यता अधिक असते म्हणूनच कंडोम आवर्जून जवळ ठेवावा.

२ ) त्या क्षणांचा आनंद घ्या

शारिरीक गरज ही अनेकदा अहंकाराची गोष्ट बनते आणि यामुळे सारे काही विस्कटून जाते. चित्रपटात किंवा पॉर्न फिल्ममध्ये दाखवल्या जाणार्‍या गोष्टी हे फक्त रंजित व काल्पनिक स्वरूप असते म्हणून या गोष्टींचे अनुकरण करणे टाळा व तुमच्या साथीदारासोबत केवळ ‘त्या’ सुंदर क्षणांचा सुखद अनुभव घ्यायला शिका.

३ ) कामक्रिडेला वेळ द्या, ती आजची गरज आहे.

पुरूष कामक्रीडेला वेळ देत नाहीत ही तक्रार बर्‍याच स्त्रियांची असते. प्रत्याक्षात संभोग करण्यापूर्वी कामक्रीडा करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. चुंबन, स्पर्श, ओरल सेक्स यासारख्या गोष्टींना देखील पुरेसा वेळ द्या. व यातून वातावरणनिर्मीती करा तसेच स्त्रियांना संभोगातून योग्य प्रमाणात ऑर्गेझम ( परमोच्च संभोगसुख) मिळेल याची काळजी घ्या.

४ ) काही वेळेस त्रास होण्याची शक्यता अधिक असते.

काही वेळेस पहिल्यांदा सेक्स करताना त्रास होण्याची शक्यता अधिक असते. तुमचे शिश्न संवेदनशील असू शकते किंवा कदाचित तुमच्या साथीदाराला वेदना होऊ शकतात. पहिल्या सेक्सच्या वेळेस वेदना होणे हे अगदी सामान्य आहे. दर पाच पैकी एका स्त्रीला असा त्रास होतोच. बर्‍याचदा शुष्क योनीमार्गामुळे हा त्रास होऊ शकतो म्हणूनच योग्य ती काळजी घ्या.


५ ) गैरसमजांच्या आहारी न जाता त्यांना तिलांजली द्या.

पहिल्यांदा संभोग करताना स्त्रियांमध्ये रक्तस्त्राव होतोच हा गैरसमज आहे. पहिल्यांदा सेक्स करताना प्रत्येक स्त्रीला रक्तस्त्राव होतोच असे काही नाही. कारण स्त्रीच्या योनीमार्गाच्या मुखाशी असलेला ‘हायमेन’ नामक अतिशय नाजुक पडदा (tissue) धावणे, सायकल चालवणे, उड्या मारणे किंवा अगदी स्विमिंग सारख्या व्यायाम प्रकारातूनही अगदी सहज फाटू शकतो. तर काही जणींमध्ये हा पडदा जन्मजातच नसतो. त्यामुळे रक्तस्त्रावाचा स्त्रीच्या पावित्र्याशी संबंध लावणे टाळा.

६ ) संवादाने जवळ या..

सेक्स करण्यापूर्वी जोडप्यांमध्ये पुरेसा मोकळेपणा नसतो. याचा परिणाम लैंगिक सुखावर होतो. त्यामुळे एकमेकांशी संवाद साधा. एकमेकांची आवडनिवड जाणून घ्या. शारीरिक संबंधाविषयी एकमेकांच्या अपेक्षा जाणून घ्या. भीती, शंका दूर करा. म्हणजे पहिल्यांदा सेक्स करताना कोणत्याही प्रकारचं दडपण राहणार नाही.

७ ) शीघ्रपतनाची समस्या

पहिल्यांदा सेक्स करताना शीघ्रपतनाची किंवा शिश्नाची ताठरता न राहण्याची समस्या उद्भवू शकते मात्र हळूहळू योनी व शिश्न यांचा संबंध वाढला की,शीघ्रपतनाची समस्या कमी होते. शीघ्रपतनासोबतच शिश्नाची ताठरता न राहणे ही समस्यादेखील मानसिक तणावामुळे आढळून येते. मात्र हळूहळू ही समस्यादेखील नाहीशी होईल. पण दीर्घकाळ ही समस्या राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या कारण ही समस्या रक्तदाब किंवा हृदयरोगाचे लक्षण असण्याची शक्यता असते.

८ ) हळूहळू परिस्थिती सुधारेल.

पहिल्यांदा सेक्स करताना प्रत्येकजण १००% यशस्वी होतोच असे नाही. त्यामुळे कोणतीही घाई न करता प्रत्येक क्षणांचा आनंद घ्या व अनुभवांतून शिकत तो अधिकाधिक समृद्ध करण्याचा प्रयत्न करा.


संकलन : सुशिल म. कुवर

फोटो : प्रतिकारात्मक आहे आवर्जून शेअर करू शकता


सोमवार, २८ फेब्रुवारी, २०२२

केस पांढरे व्हायला सुरूवात झालीये? स्वयंपाकघरातील १ पदार्थ वापरा; म्हातारे होईपर्यंत राहतील काळेभोर केस

तुमच्या स्वयंपाकघरात अशीच एक गोष्ट आहे, ज्याचा वापर करून तुमचे केस देखील काळे होतील आणि त्याचे कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत.

आपले केस नेहमी काळेभोर, सुंदर दिसावेत असं प्रत्येकालाच वाटत असतं. आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे केस पांढरे होणे सामान्य झाले आहे. वाढत्या वयामुळेच नाही तर अनेक पोषक तत्वांच्या कमतरतेमुळेही केस पांढरे होतात. (Hair Care Tips)  प्रत्येक तिसरा व्यक्ती अशा प्रकारच्या समस्येशी झुंजत आहे, पण तुमच्या स्वयंपाकघरात अशीच एक गोष्ट आहे, ज्याचा वापर करून तुमचे केस देखील काळे होतील आणि त्याचे कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत. (Grey hair solution without dying) 

पांढरे केस नैसर्गिकरित्या काळे करण्यासाठी तुम्ही चहाच्या पानांचाही वापर करू शकता. पांढरे केस काळे करण्यासाठी गरम पाण्यात चहाची पाने उकळा. यामध्ये तुम्ही सुमारे 7 टी बॅग किंवा 5-6 चमचे चहाची पाने घेऊ शकता.

चहाची पाने किमान एक कप पाण्यात उकळा. हे पाणी थंड झाल्यावर डोक्याला लावा. 35-40 मिनिटे ठेवल्यानंतर कोमट पाण्याने केस चांगले धुवा. तुम्हाला दिसेल की यामुळे तुमच्या केसांना रंग येईल. (Permanent solution for grey hair naturally)

चांगल्या परिणामांसाठी या टिप्स वापरा

चहाच्या पानांचा प्रभाव थोडा अधिक वाढवण्यासाठी तुम्ही चहाच्या पानांमध्ये कॉफी देखील वापरू शकता. कारण यामुळे तुमच्या केसांवर आणखीनच रंग येईल.यासाठी 3 चमचे कॉफीमध्ये 2 चमचे चहाच्या पानांमध्ये मिसळा आणि एक कप पाण्यात सुमारे 15 मिनिटे उकळा. यामुळे पांढरे केस नक्कीच काळे होतील.  लक्षात ठेवा की चहाची पाने लावल्यानंतर लगेच केसांवर शॅम्पू वापरू नका, कारण यामुळे केसांना योग्य रंग येणार नाही आणि आलेला रंग देखील निघून जाईल. 2 दिवसांनी शॅम्पू करण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमच्या केसांचा रंग जास्त काळ टिकेल.

इतर उपाय

१) मेथी खोबरेल आणि एरंडेल तेलात मिसळून शिजवा. त्यानंतर तेल थंड झाल्यावर डोक्याला मसाज करा. असे एक आठवडा सतत करत राहा, केस पांढरे होण्यापासून लवकरच सुटका होईल.

२) पांढरे केस काळे करण्यासाठी कांदा खूप गुणकारी आहे. कांद्याचा रस केसांच्या मुळांना लावा, नंतर कोरडे झाल्यावर केस शॅम्पूने धुवा. आठवड्यातून 2 ते 3 वेळा कांद्याचा रस वापरा. यामुळे केसांची वाढही चांगली होईल.

३) कोरफडीमुळे त्वचा तर चमकदार तर होतेच पण त्याचबरोबर केसांनाही चमक मिळते. जेव्हाही तुम्ही केसांना तेल लावाल तेव्हा कोरफडीच्या जेलने स्कॅल्पला थोडा वेळ मसाज करा. ते सुकल्यावर शॅम्पूने धुवा आणि कंडिशनर लावू नका.


फोटो प्रतिकात्मक आहे आवर्जून शेअर करू शकता


रविवार, ३० जानेवारी, २०२२

"एक महोब्बत ऐसी भी" 😑

शाम का समय था। मैं रेलवे स्टेशन पर एक बैंच पर एकांत में बैठा ट्रैन का इंतजार कर रहा था। ट्रैन दो घंटे बाद आने वाली थी।
अचानक एक सुंदर सी महिला मेरे पास आकर बैठ गई।
मैं महिलाओं से वैसे ही घबराता हूँ। अनजान हो तो मेरी जान ही निकलने लगती है।
कुँवारा ब्रह्मचारी आदमी ठहरा इतने करीब जनानी को कैसे सहन कर पाता। मैं खड़ा होकर चलने लगा तो उसने कहा बैठ जाओ।
मैंने आँखों से प्रश्न किया:-???
जवाब में वह बोली:- पहचाना नही क्या?"
मैंने "ना", में गर्दन हिलाई।
उसने उदास होकर कहा:-"मैं रशमी"।
"ओह" मेरे मुख से बस इतना ही निकला।
यादों पर जमा कुछ कोहरा हटा और गौर से उसका चेहरा देखा तो उसकी दस साल पुरानी वास्तविक आकृति जहन में उभर आई। मोहल्ले की लड़की थी। साथ में भी पढ़ी थी। सालभर पागल भी रही थी।
"बहुत दर्द हुआ आज, जिसके लिए खुद को बर्बाद कर लिया। वो शख्स तो मुझे पहचानता भी नही"। वो मरी आवाज में बोली।
मैं कुछ समझ नही पाया। आँखों में प्रश्न लेकर उसकी और देखा:-???"
"मैंने तुम्हे इतना चाहा? तुम्हे कुछ भी पता नही?"
मैंने फिर "ना" में गर्दन हिलाई।
"याद कर 12 वीं कक्षा में तेरी कॉपी में "I LOVE YOU लिख कर किसी ने पर्ची दबाई थी?
"हाँ, मग़र वह तो किसी लड़के की करतूत थी"।
"पागल, वो कोई लड़के की मजाक नही मैं ही थी"।
"ओह, मगर लिखावट तो तेरी नही थी। जब मैंने हल्ला मचाया था। सारे टीचर इकट्ठे हो गए थे। लिखावट मिलाई गई। मगर किसी की नही मिली।"
'कैसे मिलती? मैंने उलटे हाथ से जो लिखा था।" इस बार वह जरा मुस्कराई।
"ओह!!" मैंने आश्चर्यचकित होकर उसे देखा। जैसे ब्रेल लिपि पढ़ने की कोशिश कर रहा हूँ।
"हाँ, तू सचमुच भोला था। तेरे इसी भोलेपन पर तो मेरा दिल आ गया था। 12 वीं के बाद मेरी पढ़ाई छूट गई थी।
और तू कॉलेज जाने लगा था। तब मैंने साल भर पागलपन का नाटक किया था"।
"झूठी, तू सचमुच पागल थी"।
"हाँ पागल थी। तेरे प्यार में। देश-दुनिया की खबर ही नही थी। अपना होश भी नही सम्भाल पा रही थी। पागलपन के बहाने से तेरे घर आकर छुप जाया करती थी। इसी बहाने तुझे छू लिया करती थी।"
"चल झूठी, तुमने पागलपन में कइयों को काट लिया था। याद नही क्या?
"हाँ याद है सबकुछ तो याद है। चाहत के लम्हे ऐसे ही भूले जाते हैं क्या? याद कर मैंने सबको काटा मग़र तुझे क्यों नही काटा? तुम मुझे पकड़ कर घर वालों के हवाले कर दिया करते थे। और मैं बड़ी आसानी से तुम्हारी पकड़ में आ जाया करती थी। इसी बहाने तुझे छूने का का मौका मिल जाया करता था। यही तो हसरत रहती थी मेरी। तुझे छूने के लिए अपना वजूद तक दांव पर लगा दिया था मैंने।"
मैं निरूत्तर सा हो गया। फिर मैंने कहा:-" नही तू सचमुच पागल ही थी। याद कर जब मैं तालाब में नहा रहा था। तुम मेरे कपड़े उठा कर ले गई थी। मैं पूरे दिन खेतों में चड्डी में घूमता रहा मग़र तुमने शाम तक मेरे कपड़े नही दिए। ऐसा तो कोई पागल ही कर सकती थी।"
"हाँ कपड़े उठाए थे मैंने। मग़र जरा सोच तेरे ही क्यूँ उठाए थे? और भी तो तेरे कई दोस्त नहा रहे थे?  बड़ा मजा आया था मुझे इस खेल में। शाम को तेरे कपड़े मैंने वापस भी तो कर दिए थे। मेरे अपने थे तुम। ढंग से तुझे देखने का हक था मेरा सो मैंने देख लिया।" ,फिर उसने एक गहरी सांस लेकर कहा:-" बड़ी कीमत चुकानी पड़ी थी मुझे इस खेल की। तेरी माँ शिकायत लेकर आ गई थी। इस कारण घर वालों ने मुझे खूब पीटा। फिर रातभर बेड़ियों से बाँधे रखा था। मगर सारी सजा उस आनन्द के सामने कुछ भी नही थी रे"!
 अब मेरे पास कोई जवाब नही था। मुझे उससे आँख मिलाने की भी हिम्मत नही हो रही थी।
उसने कहना जारी रखा:- तुझसे महोब्बत की सजा तो मैं अब भी भोग रही हूँ। पागल समझ कर घर वालों ने बुड्ढे के पल्ले बाँध दिया। मुझसे 15 साल बड़ा है वो। मग़र जो भी है, पति है मेरा। निभा रही हूँ। दो बच्चे भी हैं मेरे। मग़र तू आज भी मेरे दिल, मेरे जहन से निकलता ही नही। मुझे छूता कोई और है मग़र स्पर्श तेरा ही महसूस किया है मैंने। ये जिंदगी तेरे नाम की है। सारी उम्र तेरी ही रहेगी। प्यार एक बार होता है। मुझे भी हुआ। बिना किसी उम्मीद के मैंने तुझे चाहा। चाहती रहुँगीं। ओह अब मेरी ट्रैन आ गई है। दूर की मुसाफिर हूँ अब जाना पड़ेगा। मग़र आज जिंदगी की सबसे बड़ी खुशी पाली है मैंने। तुझे अपने दिल का हाल बताकर। 
अब मर भी जाऊँ तो कोई गम नही।"
इतना कह कर वो चली गई। मैं जड़वत पत्थर बना बैठा रहा। वो स्टेशन की भीड़ में कहीं ओझल हो गई।

संकलन : सुशिल म. कुवर

 फोटो प्रतिकारात्मक है शेअर कर सकते है

गुरुवार, १३ जानेवारी, २०२२

जब तुम प्यार करती हो...

तुम्हारी आँखें चमकती हैं जब तुम प्यार करती हो.. 
मेरा दिल धड़कता है जब तुम प्यार करती हो.. 
दुनिया में मैं ही मैं लहरता हूँ जब तुम प्यार करती हो.. 
दुनिया बेहद नर्म लगती है जब तुम प्यार करती हो.. 
अंधेरी गुफाओं में रोशनी झर-झर झरती है जब तुम प्यार करती हो.. 
अरमानों भरी राहें खुलती हैं जब तुम प्यार करती हो..
अपना मैं खोता हूँ जब तुम प्यार करती हो..  
तुमको मैं से भरता हूँ जब तुम प्यार करती हो..!

संकलन : सुुुशिल म. कुवर

तसवीर : प्रतिकात्मक है शेअर कर सकते है