गुरुवार, ३१ मे, २०१८

खरं प्रेम आणि सेक्स :


"खरं प्रेम केलं असेल तर ते जोड़पं सेक्स करुचं शकत नाही." हे भंपक वाक्य डोक्यात पुरुन उरलंय. खऱ्या प्रेमात काय फक्त गालगुच्चे घेऊन गोंजारत बसतात का ? की फक्त एकमेकांचे रुसवे फुगवे काढत बसतात ?
एकतर प्रेम असतं किंवा नसतं. खरं खोटं असली काही भानगड नसते. एकतर खरच आपल्याला प्रेम झालंय की अजून स्वतःलाच खात्री नाही हे अगोदर तपासावं. प्रेम असेल तर कितीही देखणा किंवा देखणी व्यक्ती आकर्षित करून गेली तरी तोल कधीच ढळत नाही. जर तो ढळत असेन तर प्रेम वगैरे काही नव्हतं समजून जायचं स्वतःच.
प्रेम सहवासातून फुलतं. एकेमकांच्या चुकाही तितक्याच आवडू लागतात जितके चांगले गुण. इगो वगैरे फाट्यावर मारलेला असतो बरं का. अगदीच बालिश चुकांवर कोणी रुसून फुगून नाही बसत. नात्याला वेळ देणं आणि करियर सांभाळणं हे प्रेमचं शिकवतं.
आज एक, चार महिन्यांनी दुसरं कुणीतरी आवडतं असेन आणि सतत फूलपाखरासारखं मन उडत असेन तर थांबा, अजून प्रेम झालंच नाही तुम्हाला. केवळ कपल म्हणून चारचौघात मिरवायचं किंवा फील घ्यायचा म्हणुन तुम्ही फ़क्त भावनीक अँटँच झालेले आहात. ते प्रेम वगैरे नाहीये.
प्रेमाला तरी खरं खोट असले लेबल्स लावून बदनाम नका करू. नातं किती घट्ट आहे हे तुम्हाला स्वतःलाच जास्त कळतं. नात्याला भविष्य आहे का ? खंबीरपणा आहे का ? इतका साधा अंदाज नसेन लावता येत तर केवळ मज्जा म्हणून कशाला दिवस ढकलायचे.
एकदा आपण खरचं प्रेमात आहोत का स्वतः तपासून पहा तरी मग सेक्सवर बोलुयात....

- सुशिल म. कुवर
----------------------–------------------------------------------
फोटो प्रतिकारात्मक आहे आवर्जून शेअर करू शकता


बुधवार, ३० मे, २०१८

सेक्स ही तिची देखील गरज आहे....


पाहण्याचा वगैरे कार्यक्रम झालेला. एकदिवस त्याचा फोन आला आणि भेटायला येशील का विचारलं. काहीच हरकत नव्हती. ठरल्या वेळेला दोघेही पोहचलो. आपण एकमेकांना जाणून घ्यायला हवं अशी तुटक तुटक सुरुवात त्याने केली. स्वतःबद्दल सगळं काही सांगितलं. पास्ट रिलेशनशिप होत्या, वगैरे वगैरे. पण आता तसं काहीच नाहीये म्हणाला.
मुळात मी पहिल्यापासूनच स्ट्रेट फोरवर्ड. “तू व्हर्जिन आहेस का ?” असा खोचक प्रश्न मी केला. अंगावर एकदम असा काहीसा प्रश्न आल्यामुळे तो थोडासा बावचळला. त्याची झालेली अडचण पाहून मी स्वतःबद्दल सांगण्यास सुरुवात केली..मी होते पूर्वी रिलेशनशिप मध्ये. कोलेजलाइफ होतं ते. अगदी सगळं झालेलं, अर्थात सेक्स सुद्धा.आता आमच्यात तसं काही नाहीये. मुलगी असं स्वतःहुन काहीतरी सांगेन त्याला अपेक्षित नव्हतं. वरवर बोलून त्याने काढता पाय घेतला.मला ते लक्षात आलेलं...
बर्याच दिवसानंतर वडिलांकडूनच कळालं की मुलगा काही तयार नाहीये लग्नाला. असो, हरकत नाही. त्याला हे सगळं झेपलं नव्हतं हे मला तेव्हाच कळालेलं. मुळात काय झालंय माहिती का, आम्ही आजची पिढी बराच पुढचा विचार करतो बरं का. पण पिढी म्हणजे सगळेच नाही. आमच्यातही अनेक गट आहेत. कोणासाठी लग्नाआधी सेक्स हे खूपच नॉर्मल तर कुणी विचार देखील करू शकत नाही....
मज्जा सांगते, मी गावाकडे वगैरे जायचे तेव्हा सहज तिथल्या मुलींना मास्टरबेशन वगैरे काही माहितेय का विचारायचे. प्रश्नचिन्ह असायचं चेहऱ्यावर. आपल्याकडे कसंय की मुलगा वयात आला की तो मास्टरबेशन वगैरे करतो हे सगळ्यानांच माहित असतं.(कोणी तोंडावर दाखवत नसलं तरी). मुलगी करत असेन हा विचारही येत नाही. अर्थात ज्या मुलींबद्दल असं वाटतं त्या चारीत्र्यहीन वगैरे असतात सगळ्यांच्या दृष्टीने...
सेक्सची तीव्र गरज ही फक्त पुरुषाला निर्माण होऊ शकते हा अगदीच गोड गैरसमज. मुलींना त्यातलं काही कळता कामा नये. जे काही असेल ते लग्नानंतर नवरा शिकवेन तिला...
मुलांना सेक्स हवं असतं. त्यामुळे ते मुलीना भावनिक गुंतवतात. मग ते तिच्याशी शरीरसंबंध ठेवतात. सेक्स झालं की मुलाचं प्रेम आटतं. ते मुलीला सोडून देतात. त्यामुळे मुलींनी सांभाळून राहावं. याचा अर्थ या सर्व प्रोसेस मध्ये मुलीला कुठेही सेक्स ची इच्छा नव्हती झालेली हे आपण गृहीत धरून टाकलं.मुलगी फक्त भावनिक गुंतलेली असते ? शारीरिक इच्छा नसते तिला ? जी काही इच्छा असते ती फक्त पुरुषाला असते ? मुळात सेक्स ही गोष्ट दोघांच्या संगनमताने होते, ती दोघांचीही शारीरिक गरज असते हे मान्य करणार आहोत की नाही आपण..
उद्या नातं फिसकटलं की मुलावर बलात्काराची केस टाकून द्यायची. का तर त्याने भावनिक फसवणूक केली. मुळात जे काही सेक्स झालं त्यात दोघांचाही सहभाग आहे.
मध्यंतरी एक काकू म्हणाल्या की, “या आजकालच्या मुली लग्नाआधी सबंध ठेवतात. थोबाडीत दिली पाहिजे यांच्या. चाबकाने फोडलं पाहिजे. पुरूषाचं काय त्याला हवंच असतं पण यांना अक्कल नसावी का.संस्कृती वगैरे काही आहे की नाही. आमच्यावेळी असलं काही केलं असतं तर विहरीत ढकलून दिलं असतं घरच्यांनी.” बोलण्याचा सगळा रोख जर पाहिला तर मुलगी सेक्स कशी काय करू शकते याचाच त्रागा जास्त दिसतोय. पुरुषाला त्यांनी गृहीत धरून टाकलय...
सेक्स ही पुरुषाची मक्तेदारी नसून स्त्रीचं देखील त्यात तितकंच योगदान असतं. दोघांच्याही शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी दोघे एकत्र येतात. पूर्वी असं नसायचं म्हणून ते आत्ताही नसेलच असं नाही. शय्येवर स्त्री एक्टीव्ह असली म्हणून लगेच तिला अनुभवी वगैरे शिक्का मारण्याला काही अर्थ नाही. जितकी गरज पुरुषाला निर्माण होते तितकीच ती स्त्रीला.

- सुशिल म. कुवर
------------------------------------------------------------
फोटो प्रतिकारात्मक आहे आवर्जून शेअर करू शकता

मंगळवार, २९ मे, २०१८

लव्ह, सेक्स & ब्रेकअप...

प्रेमामध्ये पुरुषांची कामुकतेकडे जास्त ओढ असते तर स्त्रीची भावनांकडे, हे पूर्णतः नैसर्गिक आहे. अनेक प्रेमप्रकरणे केवळ सेक्सचा बँलन्स व्यवस्थित सांभाळता न आल्यामुळे तुटतात. मुलाकडून सेक्ससाठी विचारणा होताच मुलीच्या मनातील विश्वास डळमळतो. तिला सतत वाटत असतं कि याने पूर्वीसारखं छोट्या छोट्या गोष्टींमध्ये माझी काळजी घ्यावी. मला वेळ द्यावा. रोमांटिक गप्पा माराव्यात. हातात हात घेऊन तासंतास बसावं. सुरुवातीच्या काळामध्ये पुरुषाने आपली छाप पाडण्यासाठी या सार्या गोष्टी केल्या असल्या तरी त्याला यात सातत्य ठेवता येईल कि नाही याची कोणतीही ग्यारेंटी नसते.
“एकदा सेक्स झालं कि पुरुषाचा स्त्रीमधील इंटरेस्ट संपतो” हे सरसकट विधान करणं चुकीचं आहे. मुळात सतत सहवास आल्यामुळे नात्यातील नवखेपण आणि कुतूहल कमी होतं. प्रेमाची खरी कसरत हे नवखेपण टिकवण्यात आहे...
वयात आल्यापासूनच मुले हस्तमैथुन करतात. याचा अर्थ पुरुष हा फक्त वासनेचा भुकेला असतो असे नाही. शरीरात जे बदल घडतात त्यानुसार कामवासनेला मार्ग खुला करून देण्यासाठी हस्तमैथुन केले जाते. वयाच्या पंधराव्या वर्षापर्यंत पुरुषाला हस्तमैथुन काय असते याची समज आलेली असते याउलट स्त्रीला याची जाण नसते. याचा अर्थ स्त्रिया हस्तमैथुन करत नाहीत असे नाही. हे प्रमाण पुरुषांपेक्षा कमी आहे एवढंच. यौवनात येईपर्यंत पुरूषाचं आणि स्त्रीचं भावविश्व हे वेगवेगळं असतं. स्त्री रोमांटिक कथा,कादंबरी,चित्रपटांमध्ये रमते तर पुरुषाला प्रणयाचे सिन्स मोहात पाडतात. त्यामुळे प्रेमात पडणाऱ्या मुलाचे आणि मुलीचे भावविश्व हे पूर्णतः वेगवेगळे असते...
त्यामुळे आपली गर्लफ्रेंड अरसिक आहे तर आपला बॉयफ्रेंड वासनाधीन आहे असा गैरसमज लगेच कुणी करून घेऊ नये. हा पेचप्रसंग दोघांतील संवादाने सुटू शकतो. दोघांनी एकमेकांचं भावविश्व जाणून घ्यायला हवं. सेक्ससाठी मानसिकदृष्ट्या ती परिपक्व नसेल तर त्यानेही उगाच भावनिक जबरदस्ती करू नये. याउलट सतत तो सेक्सचा विषय काढतो म्हणून तिनेही त्याला फाल्तुक ठरवू नये.
जोडीदाराच्या भावना समजून घेऊन मनाचा तळ गाठण्याचा सातत्याने प्रयत्न करावा. तिसर्या व्यक्तीला वाटाघाटी करण्यासाठी बसवू नये. दोघांनी एकमेकांशी प्रत्येक गोष्टीत आडपडदा न ठेवता मनमोकळेपणाने बोलावं. एकमेकांच्या उणीवा दोघांपुरत्या मर्यादित ठेवाव्यात...ब्रेकअप होऊ नये वाटत असेल तर.

- सुशिल म. कुवर
................................................................................................
आवर्जून शेअर करू शकता फोटो प्रतिकात्मक आहे.

सोमवार, २८ मे, २०१८

पैज.....


साधारण दोन तीन महिन्यामध्ये तिचं ब्रेकअप व्हायचं. तो फारच पजेसिव्ह झालाय हे प्रत्येकवेळी एकमेव कारण. पहिल्यापासून बिनधास्त जगण्याची सवय. थोड्सुद्धा बंधन सहन व्हायचं नाही. आई वडील दोघेही आपापल्या नोकरीमध्ये व्यस्त. काही हवं नको असेल तर लगेच हातामध्ये हजर.
मध्यंतरी कॉलेजबाहेरील एका मुलाच्या प्रेमात पडली. तो जॉब करायचा. दररोज संध्याकाळी कॉलेज सुटण्याच्या वेळी तो गेटवर हजर. दोघेही लांब कुठेतरी फिरून यायचे. दिवसभर चाटिंग सुरूच असायची. हिच्यापेक्षा तो तसा वयाने फारच मोठा. हि त्याला पिलुडी वगैरे करायची तेव्हा वर्गातील मुलांची तोंड बघण्यासारखी व्हायची. हि काय जास्त काळ याच्यासोबत टिकणार नाही यावर मुलांमध्ये पैज देखील लागायची.
व्हायचं देखील तसच. थोड्याच दिवसामध्ये तिचा इंटरेस्ट संपून जायचा. दरवेळी नवीन रिलेशन मध्ये गेली कि सगळ्या मैत्रिणींना बॉयफ्रेंडची ओळख करून द्यायची. नंतर नंतर तिला सिरीयसली घेण सार्यांनीच सोडून दिल. लोकं आपल्याला दुर्लक्ष करतायत हे बघून तिची चीड चीड वाढली. मैत्रीणीना वाट्टेल ते बोलू लागली. एका लिमिट नंतर तिचं कोणी ऐकेणा.
वर्गातील मुले देखील भाव देईनात. कितीही मेकअप केला तरी कोणी ढुंकून बघेना. सतत आपल्याकडे कोणीतरी पाहावं, काळजी घ्यावी, विचारपूस करावी या तिच्या अपेक्षांना सुरुंग लागला. स्वतःहूनच ती एखाद्या मुलाशी बोलू लागली तरी तेवढ्यापुरता गोड बोलून तोही तिच्यापासून लांब राहायचा. या सगळ्याचा परिणाम रिझल्ट वर झालाच. आधीच कसेबसे पन्नास टक्के मिळायचे. यंदा दोन विषय बँक राहिले.
शेवटी तसही लास्ट इयर असल्यामुळे घरच्यांनी स्थळे पाहायला सुरुवात केलेली. एक मुलगा तिला पसंद पडला. तिने होकार कळवला. दुसर्याचदिवशी त्याच्यासोबतचा सेल्फी व्हाटसएप डीपीला तिने लावला आणि आता इकडे तिच्या घटस्फोटावर पोरांनी पैज लावली.....


- सुशिल म. कुवर
------------------------------------------------------------
फोटो प्रतिकारात्मक आहे आवर्जून शेअर करू शकता

शनिवार, २६ मे, २०१८

कामसूत्र भाग २

कोणतेही ऋतू पाहून माणूस सेक्स करत नाही. मनुष्यासाठी संभोगामागचा उद्देश्य हा केवळ संततीप्राप्ती नसून आनंद मिळवणे आहे. प्राणी हे ऋतू नुसार सेक्स करतात आणि त्यामागचा उद्देश्य हा प्रजनन असतो...

आचार्य वात्स्यायन यांचं देखील हेच म्हणणं आहे की माणसासाठी सेक्स हे काही ठराविक वेळेपुरतं मर्यादित नसून हा संभोग सर्व ऋतूंमध्ये, रात्री किंवा दिवस आणि कोणत्याही वेळी होऊ शकतो.

“आम्हाला दहा पोरं झाली पण आम्ही कधी असं प्रेम केलं नव्हतं" हे जे मागच्या पिढीकडून टोमणे ऐकावे लागायचे ते हा फरक लक्षात न आल्यामुळे. ”सेक्स हे केवळ संततीप्राप्ती करण्यासाठी असून प्रेमामध्ये सेक्सला थारा नाही" हा जो भ्रम पसरला गेला याचं मूळ अज्ञान आहे...

माणसासाठी सेक्स हे आनंद मिळवण्यासाठी असतं हा बेसीक फरक एकदा क्लियर झाला की पुढे एक एक मुद्दे उलगडणे सोपे होऊन जाईल. साधारण २ हजार वर्षांपूर्वी महर्षी वात्स्यायन यांनी लिहलेल्या कामसूत्र या ग्रंथाची जी भाषांतरे उपलब्ध आहेत त्याचा संदर्भ घेऊन मी रोजच्या जीवनातील अनेक प्रश्नांची उकल करण्याचा प्रयत्न करेन. वाचक म्हणून तुम्ही तो समजून घ्याल अशी आशा करतो.

- सुशिल म. कुवर
------------------------------------------------------------
फोटो प्रतिकारात्मक आहे आवर्जून शेअर करू शकता


शुक्रवार, २५ मे, २०१८

कामसूत्र भाग १


“उसळते हार्मोन्स सगळे उंचवटे, खाच खळगे पार करून हवे तिथे उत्सर्जित होऊ लागल्यानंतर आजकाल आम्ही सेक्स करतो,.... स्वमर्जीने. त्यामुळे व्हजायना, पेनिस, सक, यांसारखे शब्द आमच्या तोंडून ऐकल्यानंतर, बाळा तुझे वय किती असला खोडसाळ प्रश्न विचारून स्वतःची किती दिवस थंड करून घेणार ?” आल्या आल्या हे जळजळीत वाक्य माझ्या कानात अक्षरशः ओतलं तिने.

“यांच्या मेंदूची व्हर्जिनीटी अजून शाबूत असताना आमचं हायमेन कधी गेलं आणि नेमकं गेलं तरी कसं याच्या चौकश्या जास्त. आणि मुळात मी लहानपणी खूप पळायचे, सायकलिंग करायचे, पोहायचे ही असली गुळगुळीत उत्तरं कशासाठी द्यायची. त्याचं रक्त गेल्याचा सोहळा कधीच झालेला नसताना माझा एक पापुद्रा गेला तर त्यात एवढी दक्षता ? लग्न झाल्यानंतर नवर्याला समजेल, मग तो कसा रिअँक्ट होईल याचा विचार करून मला हवं असणारं सुख, मी चुरगळून फेकून द्यायचं ?

मुलींना अनुभवी पुरुष भावतो आणि मुलांना कोवळी मुलगी हे असले टुकार कोट्स. त्याचा रिअँक्ट होण्याचा प्रश्न येतोच कुठे ? माझी व्हर्जिनिटी कधी ब्रेक करायची हा सर्वस्वी माझा निर्णय असताना त्याच्या भावनिक संतुष्टतेचा विचार मी करावा, तोही माझ्या आयुष्यात कोण येणार आहे याची काडीचीही कल्पना नसताना ?”

“शरीराच्या कोणत्याही छिद्रावर कसलंही बंधन नसताना, जाणून बुजून एका खळग्यावर मात्र कायमचं ‘नो एंट्री’ चा साईन बोर्ड. पुरुषांनी केलेल्या मास्टरबेशनपेक्षा स्त्रियांचं असं काहीतरी वेगळं असतं, नेहमीच ते नाजूक असतं ,स्त्री ही नाजूकच असावी, रांगडेपण हे पुरूषाचं भूषण आहे. उठताना, बसताना,चालताना तिने कधीही पायामध्ये जास्त अंतर सोडायचं नाही, पुरुषाने कुठेही रस्त्यावर पायामध्ये हात चोळलेला मात्र चालतो ?”

“पाँर्नफिल्म मध्ये कायम पुरुषाच्या कंबरेच्या खाली गुडघ्यावर बसलेली स्त्री बघून, तिच्यावर कसेही शिंतोडे उडवले तरी तिने ते आनंदाने स्वीकारायचे ही दळभद्री मानसिकता मेंदूला वांजोटं बनवत असताना...कधी ती देखील डोळ्यात डोळे घालून उभी राहू शकते हे पचवूच शकत नाही.

संकलन: सुशिल म. कुवर

फोटो : प्रतिकात्मक आहे आवर्जून शेअर करू शकता