शुक्रवार, २८ एप्रिल, २०२३

सफर जिंदगी का....

''राहें छोटी हों
या लंबी
क्या फ़र्क़ पड़ता है
कि किस मुल्क की
किस सड़क पर
तुम अपनी राह खोते हो..

हज़ारों मुल्क
हज़ारों ज़ुबानें
क्या फ़र्क़ पड़ता है
कि किस मुल्क में
किस भाषा में
साधते हो तुम चुप्पी?''

संकलन : सुशिल म. कुवर

आवर्जून शेअर करू शकता फोटो प्रतिकात्मक आहे

गुरुवार, २७ एप्रिल, २०२३

दुष्काळ म्हणजे…नक्की काय असतं ग आई… ?

दुष्काळ दुष्काळ म्हणजे…
नक्की काय असतं ग आई… ?
पुस्तकातल्या एवढ्याशा धड्यात… 
खास काही समजलच नाही… 

काय उत्तर द्याव यावर… 
आईला क्षणभर काहीच सुचेनासं झालं…. 
नकळत आईच्या डोळ्यांत… 
टचकन पाणी आलं…. 

तरीही उत्तर दिलं… 
बाळ… दुष्काळ म्हणजे खरतर… 
शेतकऱ्याच्या आयुष्याला लागलेलं ग्रहण… 
करपून जात नशीब ज्याचं… 
दुष्काळाचे चटके करताना सहन…. 

नदीच्या प्रत्येक थेंबासोबत… 
शेतकऱ्याच रक्तही आटतं… 
रखरखणार मोकळ आभाळ… 
पोराबाळांच्या डोळ्यांत दाटतं… 

भेगाळलेली कोरडी जमीन… 
नजर जाईल तिथवर पसरलेली…. 
वर्षानुवर्ष वाट पाहणारी म्हातारी आजी…. 
सुख काय असतं… नेमकं हेच विसरलेली…. 

अगदी थेंबभर पाण्यासाठी… 
तरसणारी एक एक घागर… 
कवा पावल माहित नाही तरीही…. 
देवीला न चुकता घातलेला कोरडाच जागर…. 

छातीवर दगड ठेऊन… 
रोजच कोंड्याची भाकर थापणारी आई… 
दुधापायी गेलेल्या वासरासाठी… 
गोठ्यात हंबरडा फोडणाऱ्या गाई… 

पावसाच्या एका थेंबासाठी तरसणारा… 
काळ्या मातीचा कण अन कण… 
रोज नव्या कर्जात बुडून… 
आत्महत्येच्या उंबरठ्यावर पोचलेलं शेतकऱ्याच मन…. 

वर फाटक आभाळ… 
अन पायाखाली कोरडी धरणी… 
असाच काहीसा असतो हा दुष्काळ… 
आपलाच गुन्हा… का बर म्हणावी हि देवाची करणी…?

आई… थांबवता नाही का येणार हे… 
आपल्या लाडक्या बाप्पाला सांगून…?
बाळा… तोही आता थकलाय रे… 
आपली रोजची गार्हाणी ऐकून… 

थांबवायचं असेल हे सगळ…. 
तर आपणच पाऊल उचलायला हवं… 
त्यांचं दुखं आणि आपलं सुख… 
थोड थोड वाटून घ्यायला हवं… 
कण कण साठवून अन थेंब थेंब जिरवून…. 
या निसर्गाला पुन्हा वाचवायला हवं…

संकलन : सुशिल म. कुवर
............

आवर्जून शेअर करू शकता. फोटो प्रतिकात्मक आहे 

रविवार, २ एप्रिल, २०२३

ती आणि शहर...

ती शहराच्या ठिकाणी शिक्षणासाठी आली, शहरात मनसोक्त हिंडली, प्रेमातही पडली पण काही कारणांमुळे नातं नाही टिकलं. त्यातून मुव ऑन झाली. पुढे नोकरीला लागली, रेंटने फ्लॅट घेतला, एकटी राहू लागली, सकाळी उठून स्वतःचा नाष्टा करायची किंवा कधी चहा खारी वगैरे. एखादी चपाती भाजी डब्यात भरून ऑफिसला जायची, पूर्वी स्वयंपाक जमायचा नाही पण हळूहळू जमू लागला.

ऑफिसमध्ये सुरुवातीला सगळ्यांशी मैत्री करण्याचा प्रयत्न केला, कोणी स्वतःहून मिसळून घेतलं तर कोणी अंतरच ठेवलं, टार्गेट वरून स्पर्धा सुरू झाली तशी मैत्री इर्षेत बदलली गेली, सगळेच स्पर्धक दिसू लागले, शब्द सांभाळून वापरायला शिकली, मोजकंच बोलू लागली, कामा पुरतं बोलून शांतपणे घरी येऊ लागली.

घरून लग्नासाठी प्रेशर येतच होतं. कधी फारच एकटं वाटू लागलं की वाटायचं करून टाकावं लग्न पण आपल्याला झेपेल का हि सतत मनात शंका. प्रोफेशनल लाईफ व पर्सनल लाईफ कशाचाच काही मेळ लागत नव्हता. आजूबाजूला तिचे मित्र मैत्रिणी बघता बघता बघता मैत्री, बघता बघता प्रेम व बघता बघता लग्न करून टाकत होते. 

गावाकडच्या एका ओळखीच्या मुलीचं लग्न होऊन मूल देखील झालं. ती मुलगी हिच्यापेक्षा वयाने लहान.  कधी तिला याचा राग यायचा पण जेव्हा त्या मुलीचे सोशल मीडियावर नवरा व लहान बाळासोबत फोटोज् पाहायची तेव्हा वाटायचं की निदान तिची पर्सनल लाईफ तरी सेट झाली. कधी वाटायचं ती मुलगी अगदीच लहान वयात या मोठ्या जबाबदारी मध्ये ट्रॅप झाली. झोपताना सतत असे विचार, सगळाच गोंधळ, डोकं जड होऊन जायचं. त्यात कधी मध्यरात्री उशीरा झोप लागायची. दुसऱ्या दिवशी सकाळी बरोबर सात वाजता आलार्म वाजायचा आणि नवीन दिवस सुरू व्हायचा.

- सुशिल म. कुवर
............
आवर्जून शेयर करू शकता.

शनिवार, १ एप्रिल, २०२३

सिंगल माणसांचा पक्ष...

मित्र एकामागून एक गळ्यात माळा घालून घेत असले तरी आम्ही खंबीर राहून सिंगल लोकांचा किल्ला लढवणार. जरा आठवा, तुमचे ब्रेकअप झाले होते तेव्हा आम्हीच आमचे हे मजबूत खांदे तुमच्या सेवेत हजर केलेले, तुमच्या त्या पिल्लूने ब्लॉक केल्यानंतर रात्रीचा दिवस करून आम्ही तुमच्याशी चॅटिंग केली, तुम्हाला मुव ऑन होण्यासाठी कुठेतरी बाहेर फिरायला जायचं होतं तेव्हा बॅग भरून सगळ्यात आधी कोण तयार झालेलं ? तुमचे गम भरे स्टेटस वाचून रिप्लाय कोण देत होतं ? विसरलात ? सगळं काही विसरलात ?

आज आम्हाला असं एकटं मागे सोडून बोहल्यावर चढायला काहीच कसं वाटत नाही. एवढे डेज टू गो, तेवढे डेज टू गो करून आम्हाला चिडवता ? सिंगल लोकांचा पक्ष सोडून मॅरेज क्लब या नव्या पक्षाची स्थापना केली ते केली वर लॉक डाऊन संपताच धडाधड पक्षांतर देखील करून टाकलं ? तुमची खलबते आम्हाला कधी कळलीच नाहीत. आम्हाला वाटले तुम्ही मैत्रीच्या दुनियेतील राजे माणूस पण तुम्ही तर गुपचूप पक्ष बदलून टाकला.

भलेही तुम्हाला त्या पक्षात ग्रोथ दिसली असेल, काही अमिषे मिळाली असतील, म्हणून काय  सिंगल पक्षाशी अशी गद्दारी करायची ? लक्षात ठेवा एकदिवस थंडीचे दिवस संपतील, हे दिवस देखील मागे पडतील, तेव्हा आमचीच आठवण येईल. पुन्हा स्वगृही परतण्याची विनवणी करू नका. परतीचे दोर आता आम्ही कापून टाकलेत. गेल्या पक्षात सुखी राहा. 

- सुशिल म. कुवर
........
आवर्जून शेयर करू शकता. फोटो प्रतिकात्मक आहे.

रविवार, १ जानेवारी, २०२३

घरी नवरा असतानाही का ठेवले जातात बाहेर अनैतिक संबंध ? महिलांनीच सांगितला अनुभव !

आपण आपल्या प्रत्येकाच पर्सनल आयुष्य कस जगायचं हा आपला वैयक्तिक प्रश्न आहे, त्यातही आपल्याला लैंगिक सुखाबद्दल सल्ले दिलेले कधीच आवडत नाहीतच. पण या गोष्टीचा विचार मानसशास्त्रीय दृष्टीकोनातून करायचा ठरवला तर घरी आपला मनासारखा आणि सुंदर जोडीदार असून देखील बाहेर संबंध का ठेवावे वाटतात? याचा विचार करणे खूप गरजेचे आहे. या बद्दलच आज आपण बोलणार आहोत.


आपली मनोविकासाच्या पाच अवस्था सिग्मंड फ्राॅइड या मनोविकास तज्ञांनी मांडलेल्या आहेत. यामध्ये या अवस्था सायको सेक्स्युअल डेव्हलपमेंट होत असताना आढळून येतात. या अवस्थेची पूर्तता वय जसे वाढेल तसे वेगवेगळ्या पद्धतीने होत असते. जेव्हा बाळ जन्मल्याबरोबर सर्वात आधी मातेचे स्तनपान करते. तसेच व्यक्ती आपली प्रत्येक अवस्था वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असतो.


दोन अनोळखी व्यक्तींना जन्मभरासाठी एका पवित्र नात्यांत बांधून ठेवणारे अनोखे बंधन म्हणजे विवाह बंधन आहे, नवरा बायको यांना शरीर संबंध ठेवण्याचा नैतिक अधिकार यामुळे मिळत असतो. मात्र आपण सध्या पाहत आहोत कि घरी आपला सुंदर जोडीदार असून सुद्धा त्याच्या कडून शारीरिक सुख मिळत असून सुद्धा व्यक्ति बाहेर संबंध का ठेवते?


कमजोरी :- आजच्या या धावत्या जगात आपण पहात असाल की आपले आयुष्य किती बदलल आहे, आपला आहार, आपल्याला लागलेल्या घाण सवयी, धूम्रपान याचा सर्व परिणाम आपल्या वैवाहिक जीवनावर होत आहे. याचा परिणाम म्हणजे अनेक पुरुष हे कमजोरी, टिकून न राहणे या सारख्या समस्यांना बळी पडत आहेत.


आदर न मिळाल्यामुळे :- जर पतीकडून एखाद्या महिलेला आदर, स्वाभिमान मिळत नसेल तर अशावेळी अधिक आदर आणि स्वाभिमान मिळवण्यासाठी ती इतरांशी संबंध बनवते. आपला हक्क, अधिकार आणि दर्जा जेव्हा पती पत्नीला देत नाही, तेव्हा ती स्त्री बंडखोर आणि निर्भय होते.


पैशाचा मोह :- आताच्या महिलांमध्ये पैशाचा मोह वाढल्याने ते बाहेर अनैतिक संबंध ठेवतात आणि अशा अनेक घटना देखील समोर येत आहेत. पतीद्वारा या इच्छा पूर्ण होत नसल्याने, खर्च करायला पैसे मिळत नसल्याने महिला पैशेवाल्या व्यक्तींशी अनैतिक संबंध ठेवतात.


एकटेपणा :- केलेल्या सर्वेक्षणात असे दिसले की मेट्रो शहरांतील महिला या एका कारणांमुळे सर्वात जास्त अनैतिक संबंध बनवतात, आपल्याला माहित आहे की अनेक महिलांचे पती हे परदेशात वैगेरे कामाला, असतात किंवा अनेक महिलांचे पती हे एकदा कामाला बाहेर गेले कि ते दोन-तीन महिने घरी येत नाही.


अशावेळी अनेकदा महिलांना पती सोबत नसल्याने एकट्या पडल्या सारखं वाटतं, तसेच अशा पद्धतीचे मेट्रो शहरातील वातावरणच असते कि अशा वेळेस महिला अनैतिक संबंधाच्या दिशेकडे खेचले जातात. त्या या मार्गावर त्यांना वाटत असलेला एकटेपणा घालवण्यासाठी नाईलाजाने निघून जातात.


भावना समजून न घेणे :- सर्वात मोठे कारण विवाहबाह्य संबंध ठेवण्याचे म्हणजे एकमेकांच्या भावना समजून न घेणे. जेव्हा पती हा पत्नीची भावना समजून घेत नसेल, तेव्हा तिला खूप वाईट वाटते. आजच्या स्त्रीला जर तिच्या पतीकडून सन्मान मिळाला नाही तर ती बंडखोर बनते. याच परिणाम म्हणून ती एखाद्याच्या प्रेमात पडते ज्याला तिच्या भावना समजतात.


लग्नाला कंटाळणे :- स्त्रियांना एखाद्या गोष्टीने खूप कंटाळा येतो. ही बाब जर आजकाल वै ्वाहिक नात्यात लागू असेल तर आश्चर्य वाटणारी आहे. जेव्हा एखादी स्त्री लग्नाला कंटाळते तेव्हा असे दिसून आले आहे की ती तिच्या आयुष्यात उत्साह आणि ताजेपणा आणण्यासाठी ती बाहेरील व्यक्तीबरोबर संबंध ठेवते.

संकलन : सुशिल म. कुवर 

फोटो: प्रतिकारात्मक आहे आवर्जून शेअर करू शकता.