My Blog
शुक्रवार, २८ एप्रिल, २०२३
सफर जिंदगी का....
गुरुवार, २७ एप्रिल, २०२३
दुष्काळ म्हणजे…नक्की काय असतं ग आई… ?
रविवार, २ एप्रिल, २०२३
ती आणि शहर...
शनिवार, १ एप्रिल, २०२३
सिंगल माणसांचा पक्ष...
रविवार, १ जानेवारी, २०२३
घरी नवरा असतानाही का ठेवले जातात बाहेर अनैतिक संबंध ? महिलांनीच सांगितला अनुभव !
आपण आपल्या प्रत्येकाच पर्सनल आयुष्य कस जगायचं हा आपला वैयक्तिक प्रश्न आहे, त्यातही आपल्याला लैंगिक सुखाबद्दल सल्ले दिलेले कधीच आवडत नाहीतच. पण या गोष्टीचा विचार मानसशास्त्रीय दृष्टीकोनातून करायचा ठरवला तर घरी आपला मनासारखा आणि सुंदर जोडीदार असून देखील बाहेर संबंध का ठेवावे वाटतात? याचा विचार करणे खूप गरजेचे आहे. या बद्दलच आज आपण बोलणार आहोत.
आपली मनोविकासाच्या पाच अवस्था सिग्मंड फ्राॅइड या मनोविकास तज्ञांनी मांडलेल्या आहेत. यामध्ये या अवस्था सायको सेक्स्युअल डेव्हलपमेंट होत असताना आढळून येतात. या अवस्थेची पूर्तता वय जसे वाढेल तसे वेगवेगळ्या पद्धतीने होत असते. जेव्हा बाळ जन्मल्याबरोबर सर्वात आधी मातेचे स्तनपान करते. तसेच व्यक्ती आपली प्रत्येक अवस्था वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असतो.
दोन अनोळखी व्यक्तींना जन्मभरासाठी एका पवित्र नात्यांत बांधून ठेवणारे अनोखे बंधन म्हणजे विवाह बंधन आहे, नवरा बायको यांना शरीर संबंध ठेवण्याचा नैतिक अधिकार यामुळे मिळत असतो. मात्र आपण सध्या पाहत आहोत कि घरी आपला सुंदर जोडीदार असून सुद्धा त्याच्या कडून शारीरिक सुख मिळत असून सुद्धा व्यक्ति बाहेर संबंध का ठेवते?
कमजोरी :- आजच्या या धावत्या जगात आपण पहात असाल की आपले आयुष्य किती बदलल आहे, आपला आहार, आपल्याला लागलेल्या घाण सवयी, धूम्रपान याचा सर्व परिणाम आपल्या वैवाहिक जीवनावर होत आहे. याचा परिणाम म्हणजे अनेक पुरुष हे कमजोरी, टिकून न राहणे या सारख्या समस्यांना बळी पडत आहेत.
आदर न मिळाल्यामुळे :- जर पतीकडून एखाद्या महिलेला आदर, स्वाभिमान मिळत नसेल तर अशावेळी अधिक आदर आणि स्वाभिमान मिळवण्यासाठी ती इतरांशी संबंध बनवते. आपला हक्क, अधिकार आणि दर्जा जेव्हा पती पत्नीला देत नाही, तेव्हा ती स्त्री बंडखोर आणि निर्भय होते.
पैशाचा मोह :- आताच्या महिलांमध्ये पैशाचा मोह वाढल्याने ते बाहेर अनैतिक संबंध ठेवतात आणि अशा अनेक घटना देखील समोर येत आहेत. पतीद्वारा या इच्छा पूर्ण होत नसल्याने, खर्च करायला पैसे मिळत नसल्याने महिला पैशेवाल्या व्यक्तींशी अनैतिक संबंध ठेवतात.
एकटेपणा :- केलेल्या सर्वेक्षणात असे दिसले की मेट्रो शहरांतील महिला या एका कारणांमुळे सर्वात जास्त अनैतिक संबंध बनवतात, आपल्याला माहित आहे की अनेक महिलांचे पती हे परदेशात वैगेरे कामाला, असतात किंवा अनेक महिलांचे पती हे एकदा कामाला बाहेर गेले कि ते दोन-तीन महिने घरी येत नाही.
अशावेळी अनेकदा महिलांना पती सोबत नसल्याने एकट्या पडल्या सारखं वाटतं, तसेच अशा पद्धतीचे मेट्रो शहरातील वातावरणच असते कि अशा वेळेस महिला अनैतिक संबंधाच्या दिशेकडे खेचले जातात. त्या या मार्गावर त्यांना वाटत असलेला एकटेपणा घालवण्यासाठी नाईलाजाने निघून जातात.
भावना समजून न घेणे :- सर्वात मोठे कारण विवाहबाह्य संबंध ठेवण्याचे म्हणजे एकमेकांच्या भावना समजून न घेणे. जेव्हा पती हा पत्नीची भावना समजून घेत नसेल, तेव्हा तिला खूप वाईट वाटते. आजच्या स्त्रीला जर तिच्या पतीकडून सन्मान मिळाला नाही तर ती बंडखोर बनते. याच परिणाम म्हणून ती एखाद्याच्या प्रेमात पडते ज्याला तिच्या भावना समजतात.
लग्नाला कंटाळणे :- स्त्रियांना एखाद्या गोष्टीने खूप कंटाळा येतो. ही बाब जर आजकाल वै ्वाहिक नात्यात लागू असेल तर आश्चर्य वाटणारी आहे. जेव्हा एखादी स्त्री लग्नाला कंटाळते तेव्हा असे दिसून आले आहे की ती तिच्या आयुष्यात उत्साह आणि ताजेपणा आणण्यासाठी ती बाहेरील व्यक्तीबरोबर संबंध ठेवते.
संकलन : सुशिल म. कुवर
फोटो: प्रतिकारात्मक आहे आवर्जून शेअर करू शकता.
बुधवार, २८ डिसेंबर, २०२२
वडील होण्यासाठी पुरुषांचं योग्य वय कोणतं ? या वयानंतर थांबते स्पर्मची निर्मिती
मुलं होण्याच्या बाबतीत पुरुषांच्या वयाइतकंच स्त्रियांचं वय महत्त्वाचं असतं. याचं कारण म्हणजे वाढत्या वयाबरोबर पुरुषांमध्ये स्पर्मची संख्या आणि त्याची गुणवत्ता कमी होऊ लागते.
स्त्रियांना मुलं होण्यासाठी योग्य वय असतं, असं अनेकदा म्हटलं जातं. तुम्हीही याबाबत काहीवेळ ऐकलं असेल. मग पुरुषांच्या बाबतीत ही गोष्ट वेगळी असते का? पुरुष कोणत्याही वयात वडील होऊ शकतात का? असाही प्रश्न समोर येतो. मुलं होण्याच्या बाबतीत पुरुषांच्या वयाइतकच स्त्रियांचं वय महत्त्वाचं असतं. याचं कारण म्हणजे वाढत्या वयाबरोबर पुरुषांमध्ये स्पर्मची संख्या आणि त्याची गुणवत्ता कमी होऊ लागते.
वडील होण्यासाठी योग्य वय कोणतं?
तज्ज्ञांच्या मतानुसार, पुरुषांसाठी वडील होण्यासाठी 20 ते 30 वर्षे वय योग्य आहे. पुरुष 50 किंवा त्याहून अधिक वयाचे असले तरीही मुलं होऊ शकतात.
गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनुसार, एका व्यक्तीने वयाच्या 92 व्या वर्षी मुलाला जन्म दिला. संशोधकांच्या म्हणण्याप्रमाणे, मुलाला जन्म देण्यासाठी पुरुषांचं वय खूप महत्वाचं आहे. वयाच्या 40 वर्षांनंतर पुरुषांमध्ये बाप होण्याची शक्यता कमी होऊ लागते.
बायोलॉजिकल क्लॉक:
तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, पुरुषांमधील स्पर्मचं उत्पादन कधीच थांबत नाही. मात्र परंतु वयानुसार, स्पर्मचं डीएनए नुकसान होण्याची शक्यता लक्षणीय वाढते, ज्यामुळे प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो. न जन्मलेल्या बाळाच्या आरोग्यावरही त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो.
अनेक अभ्यासांमधून हे समोर आलंय की, जेव्हा पुरुष मोठ्या वयात पिता होतात तेव्हा मुलांमध्ये न्यूरोडेव्हलपमेंटल विकार होऊ शकतात. 2010 च्या एका अभ्यासात असं आढळून आलंय की, 40 वर्षांनंतर वडील बनलेल्या पुरुषांना त्यांच्या मुलांमध्ये ऑटिझम स्पेक्ट्रम विकसित होण्याचा धोका पाचपट आहे.
कोणत्या वयानंतर स्पर्मची निर्मिती थांबते ?
जागतिक आरोग्य संघटनेने स्पर्मचे काही निकष ठेवले आहेत. ज्यावरून निरोगी स्पर्म ठरवले जातात. यामध्ये स्पर्मची संख्या, आकार आणि हालचाल समाविष्ट आहे. त्यानुसार, वयाच्या 35 व्या वर्षी पोहोचताच पुरुषांमध्ये हे स्पर्म पॅरामीटर खराब होऊ लागतं.
या वयात पुरुष असतो सर्वात फर्टाइल
22 ते 25 वर्षांच्या दरम्यान, पुरुष सर्वात फर्टाइल असतात. अशा परिस्थितीत, त्यांना 35 व्या वर्षात मुलं जन्माला घालण्याचा सल्ला दिला जातो. कारण या वयानंतर प्रजनन क्षमता बिघडू लागते. जर तुम्ही वयाच्या 45 वर्षांनंतर मूल होण्याचा विचार करत असाल तर सर्वप्रथम डॉक्टरांशी संपर्क साधा.
संकलन : सुशिल म. कुवर
फोटो : प्रतिकारात्मक आहे आवर्जून शेअर करू शकता.
बुधवार, २८ सप्टेंबर, २०२२
मुलांनो, लग्नापूर्वी शरीर संबंध ठेवताय ? तर 'या' गोष्टी लक्षात ठेवा
एकदा का प्रेम जडले की, त्याबद्दल घडणारी कुठलीही गोष्ट कुतुहल वाटते. या वयात प्रेम असते की, आकर्षण हे आपल्याला कळत नाही. न कळत जडलेल्या या प्रेमात आपण अधिक वाहवत जातो.
पहिल्यांदा शरीर संबंध ठेवण्यात जितकी जास्त उत्सुकता वाटते तितकीच चिंता देखील. केवळ मुलीच नाही तर मुले देखील शरीर संबंध ठेवताना अधिक वेळा घाबरतात. शरीर संबंध ठेवताना नेमके त्यावेळी शरीराची काळजी कशी घ्यावी हे देखील त्यांना कळत नाही. योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे त्यांच्याकडून अनेक चुका देखील होतात.
भारतासारख्या देशात शरीर संबंधाविषयी उघडपणे बोलण्यासाठी अनेकांना संकोच वाटतो. इतर अनेक सोशल साइट्सला याविषयी अनेकदा सर्च केले जाते परंतु, याविषयी तरुण वयातील मुलांना काही कळण्याचा मार्ग नसतो. त्यासाठी शरीर संबंध पहिल्यांदा ठेवल्यानंतर काय काळजी घ्याल हे जाणून घेऊया.
१. शरीर संबंध ठेवताना योग्य वेळ पहा. हे करण्यासाठी दोघांकडे ही पुरेसा वेळ असणे गरजेचे आहे. घाईघाईने शरीर संबंध ठेवल्यास नात्यात पुढे जाऊन अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. तसेच योग्य जागा देखील निवडायला हवी.
२. पहिल्यांदा शरीर संबंध ठेवताना बरेच जोडीदार कंडोमचा वापर करत नाही. अशावेळी आपल्याला शरीराची स्वच्छता देखील राखणे गरजेचे आहे. चांगल्या शरीर संबंधाचा आनंद घ्यायचा असेल तर पूर्वनियोजन करणे अधिक गरजेचे आहे. त्यासाठी कोणत्याही प्रकारची लिंग वर्धक औषधे घेण्यास विसरू नका. याशिवाय कपड्यांबाबत कोणतीही चूक करू नका.
३. पहिल्यांदा शरीर संबंध ठेवताना अनेकदा जोडीदाराला संकोच वाटतो. त्यासाठी बळजबरी करु नका. त्यासाठी जोडीदाराशी प्रेमाने व समजेल अशा भाषेत संवाद साधा. अशावेळी गर्दी देखील टाळा, स्वत:वर नियंत्रण ठेवा.
संकलन : सुशिल म. कुवर
फोटो : प्रतिकात्मक आहे आवर्जून शेअर करू शकता.