मंगळवार, २९ मे, २०१८

लव्ह, सेक्स & ब्रेकअप...

प्रेमामध्ये पुरुषांची कामुकतेकडे जास्त ओढ असते तर स्त्रीची भावनांकडे, हे पूर्णतः नैसर्गिक आहे. अनेक प्रेमप्रकरणे केवळ सेक्सचा बँलन्स व्यवस्थित सांभाळता न आल्यामुळे तुटतात. मुलाकडून सेक्ससाठी विचारणा होताच मुलीच्या मनातील विश्वास डळमळतो. तिला सतत वाटत असतं कि याने पूर्वीसारखं छोट्या छोट्या गोष्टींमध्ये माझी काळजी घ्यावी. मला वेळ द्यावा. रोमांटिक गप्पा माराव्यात. हातात हात घेऊन तासंतास बसावं. सुरुवातीच्या काळामध्ये पुरुषाने आपली छाप पाडण्यासाठी या सार्या गोष्टी केल्या असल्या तरी त्याला यात सातत्य ठेवता येईल कि नाही याची कोणतीही ग्यारेंटी नसते.
“एकदा सेक्स झालं कि पुरुषाचा स्त्रीमधील इंटरेस्ट संपतो” हे सरसकट विधान करणं चुकीचं आहे. मुळात सतत सहवास आल्यामुळे नात्यातील नवखेपण आणि कुतूहल कमी होतं. प्रेमाची खरी कसरत हे नवखेपण टिकवण्यात आहे...
वयात आल्यापासूनच मुले हस्तमैथुन करतात. याचा अर्थ पुरुष हा फक्त वासनेचा भुकेला असतो असे नाही. शरीरात जे बदल घडतात त्यानुसार कामवासनेला मार्ग खुला करून देण्यासाठी हस्तमैथुन केले जाते. वयाच्या पंधराव्या वर्षापर्यंत पुरुषाला हस्तमैथुन काय असते याची समज आलेली असते याउलट स्त्रीला याची जाण नसते. याचा अर्थ स्त्रिया हस्तमैथुन करत नाहीत असे नाही. हे प्रमाण पुरुषांपेक्षा कमी आहे एवढंच. यौवनात येईपर्यंत पुरूषाचं आणि स्त्रीचं भावविश्व हे वेगवेगळं असतं. स्त्री रोमांटिक कथा,कादंबरी,चित्रपटांमध्ये रमते तर पुरुषाला प्रणयाचे सिन्स मोहात पाडतात. त्यामुळे प्रेमात पडणाऱ्या मुलाचे आणि मुलीचे भावविश्व हे पूर्णतः वेगवेगळे असते...
त्यामुळे आपली गर्लफ्रेंड अरसिक आहे तर आपला बॉयफ्रेंड वासनाधीन आहे असा गैरसमज लगेच कुणी करून घेऊ नये. हा पेचप्रसंग दोघांतील संवादाने सुटू शकतो. दोघांनी एकमेकांचं भावविश्व जाणून घ्यायला हवं. सेक्ससाठी मानसिकदृष्ट्या ती परिपक्व नसेल तर त्यानेही उगाच भावनिक जबरदस्ती करू नये. याउलट सतत तो सेक्सचा विषय काढतो म्हणून तिनेही त्याला फाल्तुक ठरवू नये.
जोडीदाराच्या भावना समजून घेऊन मनाचा तळ गाठण्याचा सातत्याने प्रयत्न करावा. तिसर्या व्यक्तीला वाटाघाटी करण्यासाठी बसवू नये. दोघांनी एकमेकांशी प्रत्येक गोष्टीत आडपडदा न ठेवता मनमोकळेपणाने बोलावं. एकमेकांच्या उणीवा दोघांपुरत्या मर्यादित ठेवाव्यात...ब्रेकअप होऊ नये वाटत असेल तर.

- सुशिल म. कुवर
................................................................................................
आवर्जून शेअर करू शकता फोटो प्रतिकात्मक आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा