"खरं प्रेम केलं असेल तर ते जोड़पं सेक्स करुचं शकत नाही." हे भंपक वाक्य डोक्यात पुरुन उरलंय. खऱ्या प्रेमात काय फक्त गालगुच्चे घेऊन गोंजारत बसतात का ? की फक्त एकमेकांचे रुसवे फुगवे काढत बसतात ?
एकतर प्रेम असतं किंवा नसतं. खरं खोटं असली काही भानगड नसते. एकतर खरच आपल्याला प्रेम झालंय की अजून स्वतःलाच खात्री नाही हे अगोदर तपासावं. प्रेम असेल तर कितीही देखणा किंवा देखणी व्यक्ती आकर्षित करून गेली तरी तोल कधीच ढळत नाही. जर तो ढळत असेन तर प्रेम वगैरे काही नव्हतं समजून जायचं स्वतःच.
प्रेम सहवासातून फुलतं. एकेमकांच्या चुकाही तितक्याच आवडू लागतात जितके चांगले गुण. इगो वगैरे फाट्यावर मारलेला असतो बरं का. अगदीच बालिश चुकांवर कोणी रुसून फुगून नाही बसत. नात्याला वेळ देणं आणि करियर सांभाळणं हे प्रेमचं शिकवतं.
आज एक, चार महिन्यांनी दुसरं कुणीतरी आवडतं असेन आणि सतत फूलपाखरासारखं मन उडत असेन तर थांबा, अजून प्रेम झालंच नाही तुम्हाला. केवळ कपल म्हणून चारचौघात मिरवायचं किंवा फील घ्यायचा म्हणुन तुम्ही फ़क्त भावनीक अँटँच झालेले आहात. ते प्रेम वगैरे नाहीये.
प्रेमाला तरी खरं खोट असले लेबल्स लावून बदनाम नका करू. नातं किती घट्ट आहे हे तुम्हाला स्वतःलाच जास्त कळतं. नात्याला भविष्य आहे का ? खंबीरपणा आहे का ? इतका साधा अंदाज नसेन लावता येत तर केवळ मज्जा म्हणून कशाला दिवस ढकलायचे.
एकदा आपण खरचं प्रेमात आहोत का स्वतः तपासून पहा तरी मग सेक्सवर बोलुयात....
- सुशिल म. कुवर
----------------------–------------------------------------------
फोटो प्रतिकारात्मक आहे आवर्जून शेअर करू शकता

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा